Crime News : जळगावमध्येही हिट अँड रन; भरधाव कारच्या धडकेत घरासमोर उभी महिला जागीच ठार…!

Crime News : हिट अँड रनच्या घटना आता पुणे, मुंबईसारख्या शहरातच नाही तर जळगावमध्येही घडू लागल्या आहेत. मेहरुण परिसरातील मंगलपुरीत भागात आपल्या घरासमोर गप्पा मारत उभ्या असलेल्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार महिला जखमी झाल्या आहेत. दरम्यान जमावाने चोप दिल्याने जखमी झालेल्या कार चालकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्याचे समजते.

Crime News : Hit and run in Jalgaon too; An elderly woman standing in front of her house was killed on the spot after being hit by a speeding car
शोभा रमेश पाटील (वय ६० रा. साईप्रसाद कॉलनी, मंगलपूरी, मेहरुण) असे मृत महिलेचे नाव आहे. मेहरुण परिसरात गुरुवारी सायंकाळी काही महिला घरासमोर गप्पा मारीत उभ्या होत्या. तर एक महिला रस्त्यावरुन जात होती. त्याचवेळी रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार (एमएच.०५/ एएस ०५७४) रस्त्याने आली. चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या सर्व महिलांना जोरदार धडक देत उडविले. कारची धडक इतकी जोरात होती की, त्यात शोभा रमेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात संगीता प्रकाश महाजन (वय ४८), जयश्री जगदीश राऊत (वय ३०), सुमनबाई साहेबराव पाटील (वय ६५), अर्चना पाटील (वय ४०) या महिला जखमी झाल्या आहेत. याशिवाय दोन लहान मुले देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. एका महिलेच्या हातात असलेल्या लहान बाळाला देखील मार लागला आहे. कारचा चालक पवन कैलास पाटील (वय २५, रा.रामेश्वर कॉलनी मेहरूण) हा नवशिक्या असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवरच चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला घटनास्थळी आलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button