Crime News : मृत पत्नीच्या अस्थीत दिसले ‘असे’ भलतेच काही; पतीने पोलिस ठाण्यात घेतली धाव !

Crime News : गर्भवती महिलेस प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर अचानक तिची तब्बेत खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशनची तयारी केली. दुर्दैवाने थोड्याच वेळात डॉक्टरांनी महिलेच्या आप्तेष्टांना येऊन सांगितले, की आम्ही बाळ आणि आई यापैकी कोणालाच वाचवू शकलो नाही. महिलेचा पती व अन्य शोकाकूल नातेवाईकांनी त्यामुळे मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्काराचे विधी देखील पार पाडले. दरम्यान, अस्थी गोळा करण्यासाठी गेल्यावर मृत महिलेच्या पतीला असे काही दिसले, ज्यामुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेले.

Crime News
उत्तर प्रदेशातील हस्तिनापूरच्या राठौरा खुर्द गावात सदरची खळबळजनक घडली आहे. मेरठ शहरातील हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे हे सर्व घडल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीसह नातलगांनी आता केला आहे. राठौरा खुर्द गावात राहणाऱ्या संदीप कौर याने त्याची पत्नी नवनीत कौरला प्रसुतीसाठी मेरठच्या जेके हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच ठिकाणी संबंधित डॉक्टरांनी नवनीतचे ऑपरेशन केल्यानंतर तिचा व पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नातेवाईकांनी कोणताही वाद न घालता गावातील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील उरकले होते. मात्र, सर्वजण अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत गेल्यानंतर मृत महिलेच्या पतीला राखेत ऑपरेशनसाठी वापरण्यात येणारे सर्जिकल ब्लेड दिसले होते.

थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेला वाद…
मृत पत्नीच्या अस्थीत सर्जिकल ब्लेड दिसून आल्यानंतर संदीप कौर याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नीच्या पोटातच हे सर्जिकल ब्लेड राहिले आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप त्याने केला. विशेष म्हणजे पुराव्यासाठी नातेवाईकांनी सदरच्या घटनेचा व्हिडिओ बनवला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आला आहे. दरम्यान, मृत महिलेचे नातेवाईक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही दाद मागण्यासाठी गेले होते. मेरठच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याने या घटनेनंतर त्या रुग्णालयाचा परवाना निलंबित केला आहे तसेच तपास करण्यासाठी एक चौकशी समिती नियुक्त केली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button