बाबा आमटेंच्या आनंदवनात चोपड्याच्या तरूणाने केला तरूणीचा खून !

आश्रमात जुळले होते दोघांचे प्रेमसंबंध

जळगाव टुडे । चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात एका तरूणीचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधात धोका दिल्याच्या कारणावरून त्या तरूणीचा खून करणारा संशयित आरोपी समाधान कोळी याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. तो जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचा रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. ( Crime News )

बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात खून झालेल्या तरूणीचे नाव आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २४) असे आहे. आनंदवन आश्रमात आई-वडिलांसह ती वास्तव्यास होती. त्याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचा समाधान कोळी हा उपचारासाठी आलेला होता. समाधान हा उपचार घेत असतानाच केअर टेकरचे काम देखील करत होता. दरम्यान, तिथे आरतीचे व त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र, साधारण सहा महिन्यानंतर आरतीने समाधानची साथ सोडून अन्य दुसऱ्यावर प्रेम करणे सुरू केले. त्याच रागातून समाधानने आरतीवर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. जर तुला माझ्या प्रेमाची थट्टा उडवायची होती तर मला आणाभाका कशाला घ्यायला लावल्या, असा जाब समाधानने आरतीला विचारला होता.

आरतीचे आई आणि वडील हे काही कामानिमित्त सेवाग्राम येथे गेले होते. तीच संधी साधून समाधान कोळी याने आरतीच्या घरी जाऊन तिच्याशी वाद घातला. दोघांमधील वाद टोकाला गेल्यानंतर त्याने आरतीच्या गळ्यावर तसेच हातावर चाकुचे निर्दयी वार केले. मोठ्या प्रमाणात रक्त गेल्याने आरती जागीच मृत्युमुखी पडली. रात्री उशिरा तिचे आई-वडील घरी आले तेव्हा त्यांना आपली मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आली. पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर लागलीच तपासाला वेग देऊन समाधान माळी यास जेरबंद केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button