जाणून घ्या, राज्यात कापसाला कोणत्या ठिकाणी मिळाला आहे सर्वाधिक भाव ?
जळगाव टुडे । हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापसाची आवक आता कमी झाली आहे. दरम्यान, सध्या जेवढा काही कापूस विक्रीसाठी दाखल होत आहे, त्यास वर्ध्यात सर्वाधिक 7440 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. दुसरीकडे कापसाचे किमान भाव हे 6000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत खाली देखील आले आहेत. (Cotton Market Rate)
16 मे 2024 : राज्यातील कापूस भाव (रूपये/क्विंटल)
■ वर्धा- 6150 ते 7440, सरासरी 6923
■ परभणी- 6400 ते 7430, सरासरी 7350
■ चंद्रपूर- 6733 ते 7320, सरासरी 7050
■ बुलडाणा- 6000 ते 7295, सरासरी 7100
■ जळगाव- 6250 ते 7150, सरासरी 6600
■ नागपूर- 6600 ते 7125, सरासरी 6850
■ यवतमाळ- 6850 ते 7250, सरासरी 7050
■ अमरावती- 6500 ते 7175, सरासरी 6837
(माहिती स्त्रोत- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)