राज्यातील ‘या’ बाजार समितीत कापसाला मिळाला 8000 रूपये प्रति क्विंटल भाव
Cotton Market Rate : राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापसाची आवक आता मंदावली आहे. दरम्यान, सध्या जेवढा काही कापूस विक्रीसाठी येत आहे, त्यास कमाल 7500 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार सोमवारी (ता.08) देखील बुलडाण्यात कापसाला सर्वाधिक 8000 रूपये क्विंटलचा भाव मिळाला.
08 एप्रिल : राज्यातील कापसाचे भाव (रूपये/क्विंटल)
● बुलडाणा- 7000 ते 8000, सरासरी 7850
● अमरावती- 7000 ते 7500, सरासरी 7250
● नागपूर- 6850 ते 7275, सरासरी 7365
● वर्धा- 6475 ते 7833, सरासरी 7225
● यवतमाळ- 7000 ते 7750, सरासरी 7625
● चंद्रपूर- 6250 ते 7676, सरासरी 7000