गुजरात राज्यात कापसाला मिळतोय सध्या ‘इतका’ बाजारभाव
Cotton Market Rate : देशातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या गुजरात राज्यात सध्या कापसाचे भाव कसे आहेत, त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. प्राप्त माहितीनुसार, गुजरातमधील बऱ्याच ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाचे काहीसे दबावातच आहेत. दरम्यान, बुधवारी (ता.27) हिंमतनगर येथे कापसाला सर्वाधिक 7655 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याचे दिसून आले.
27 मार्च : गुजरातमधील कापसाचे भाव (रूपये/क्विंटल)
● बोडेली- 7000 ते 7600, सरासरी 7300
● कवी- 6200 ते 6600, सरासरी 6400
● पालीताणा- 6000 ते 7500, सरासरी 6750
● जंबूसर- 6100 ते 6500, सरासरी 6300
● महुवा- 6000 ते 6990, सरासरी 6495
● हिंमतनगर- 7055 ते 7655, सरासरी 7355
● हडोद- 6800 ते 7500, सरासरी 7150
● तलेजा- 6000 ते 7595, सरासरी 6800