राज्यातील ‘या’ बाजार समितीत कापसाला मिळाला 8200 रूपये प्रति क्विंटलचा भाव
Cotton Market Rate : राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कापसाची आवक मंदावली आहे. त्यानंतरही जेवढा काही कापूस सध्या विक्रीसाठी दाखल होत आहे, त्यास मिळणारा भाव काहीअंशी दबावातच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपवाद कापसाला कमाल 8200 रूपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरूवारी (ता.21) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे कापसाची 230 क्विंटल आवक झाली. त्यास 8000 ते 8200 आणि सरासरी 8100 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सिंदी (सेलू) येथेही कापसाची 2410 क्विंटल आवक झाली, त्यास 6500 ते 7730 आणि सरासरी 7600 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. परभणी येथे कापसाची 850 क्विंटल आवक झाली, त्यास 7650 ते 7850 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अमरावतीत कापसाची 75 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 7450 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. उमरेडमध्ये 455 क्विंटल आवक होऊन 7100 ते 7550 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. वरोरा-माढेली येथे कापसाची 300 क्विंटल आवक होऊन 6500 ते 7700 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. धारणीत 100 क्विंटल आवक झाली, त्यास 6800 ते 6900 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. यावलमध्ये 73 क्विंटल आवक होऊन 6370 ते 7190 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.