विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली…नाना पटोले उचलणार आता ‘हे’ पाऊल !

जळगाव टुडे । विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीचे ९ आणि महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसकडे हक्काची ३७ मते असताना, प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची फक्त २५ मते मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची तब्बल १२ मते फुटल्याची चर्चा देखील रंगली आहे. दरम्यान, फुटलेल्या आमदारांविषयी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी मोठे वक्तव्य आता केले आहे.

Nana Patole
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सुमारे १२ मते फुटल्याने शरद पवार पुरस्कृत उमेदवाराचाही पराभव झाला आहे. याशिवाय महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासारख्या उमेदवारांना जास्तीची मते मिळाली आहेत. यासंदर्भात विधानभवन परिसरात पत्रकारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नाना पटोले यांना छेडले तसेच काँग्रेसची १२ मते कशी फुटली, त्याविषयी विचारणा केली. तेव्हा आमच्या काही आमदारांनी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली,असे नाना पटोले यांनी मान्य केले.

गेल्यावेळी सुद्धा झाले होते क्रॉस वोटींग
दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी यावेळीच नाही तर गेल्यावेळी देखील पक्षाशी गद्दारी करत क्रॉस वोटींग केले होते. अर्थात, तेव्हा गद्दारी करणारे आमदार कोण होते, त्याचा तपास लागला नव्हता. मात्र, यंदा आम्ही गद्दारी करणाऱ्या आमदारांची माहिती काढण्यासाठी व्यूहरचना आखली होती आणि त्यात काही गद्दार आमदार अडकले आहेत. ज्या आमदारांनी पक्षाशी गद्दारी केलेली आहे, त्यांची नावे आम्ही पक्ष श्रेष्ठींना कळवली आहेत. त्यांना लवकरच बाहेरचा रस्ता देखील दाखवला जाईल, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. पक्षाचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांची नावे वरिष्ठांच्या आदेशानंतर जनतेसमोर आणली जातील. त्यांना आम्ही धडा शिकविणार आहोत, असेही पटोले म्हणाले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button