Congress Party : काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांची होणार हकालपट्टी; रावेरचे शिरीष चौधरी यांच्याही नावाची चर्चा !

Congress Party : विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षादेश पाळला नाही म्हणून सात आमदारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्या वादग्रस्त आमदारांमध्ये रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचाही समावेश असल्याची चर्चा ऐकण्यात आली होती. मात्र, आमदार चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. फुटलेल्या आमदारांमध्ये नाव घेऊन माझी बदनामी करून कोणीतरी स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या ( Congress Party ) राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या १९ जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संबंधित आमदारांवर यापूर्वीच कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या आमदारांनी महायुतीला क्रॉस मतदान केल्याच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी महायुतीला क्रॉस मतदान केले आणि त्यात माझा समावेश आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. परंतू माझ्या परिवाराची माझ्या जन्मापुर्वीपासून काँग्रेसशी नाळ जुळलेली आहे. गद्दारी आणि फितुरी हे आमच्या रक्तात नाही. माझी बदनामी करण्याचे काम भाजप पक्ष करत आहे. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी फुटलेल्या आमदारांची नावे आधी जाहीर करावी. म्हणजे जे सत्य आहे ते जनतेसमोर येईल, असेही आमदार शिरीष चौधरी म्हटले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button