CMO Maharashtra : मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले जळगाव जिल्ह्याशी संबंधित ‘हे’ महत्वाचे निर्णय…!

CMO Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये जळगाव जिल्ह्याशी संबंधित काही महत्वाचे निर्णय देखील आहेत. ज्याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना भविष्यात होऊ शकेल, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

CMO Maharashtra : ‘These’ important decisions related to Jalgaon district were taken in the cabinet meeting…!

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

असे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

■ नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी सुमारे ७ हजार १५ कोटी रूपयांची मान्यता देण्याचा पहिला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ज्यामुळे नाशिकसह जळगाव जिल्ह्याला आगामी काळात सिंचनासाठी फायदा होऊ शकणार आहे.
■ पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीला सुद्धा शासनाकडून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
■ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आता केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येणार आहे. मार्च २०२४ पासून त्याची अंमलबावणी होणार असून, शासनाच्या लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल.
■ राज्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याच्या दृष्टीने योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे.
■ गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
■ ऑलिंपिकवीर स्व.पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देण्यात येणार आहे.
■ थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी दिली जाणार आहे.
■ पुणे परिसरास सिंचनासह पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढण्यात येणार आहे.
■ राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी टाकण्यात येणार आहे.
■ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत केल्या जातील.
■ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाणार असून, त्याचा सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ होईल.
■ ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रित ५ हजार कोटी रूपयांचा निधी उभारणार आहे.
■ ‘बार्टी’च्या ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ देण्यात येणार आहे.
■ मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण केली जाईल. त्यासाठी विविध महामंडळे प्रकल्प राबवविणार आहेत.
■ कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ घोषीत.
■ कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ.
■ चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल करण्यात आलेला आहे.
■ श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना सुरू ठेवण्यात आली आहे.
■ सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button