भाजप नेत्या चित्रा वाघ का म्हणाल्या ? ‘चली नहीं मोहब्बत की दुकान…!’

जळगाव टुडे । भाजपच्या नेत्या चित्रा वाघ विरोधी पक्षावर निशाणा साधताना शेरो शायरीचा अधुनमधून वापर करताना दिसून येतात. आताही त्यांनी ‘चली नहीं मोहब्बत की दुकान…बेचने चले झूठ का सामान !’, असे म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यासंदर्भात चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्वीटची सगळीकडे चर्चा देखील आहे. ( Chitra Wagh )

शहीद अग्निवीरांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केंद्र सरकारवर बुधवारी जोरदार हल्लाबोल केला होता. शहीद अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याच्या मुद्द्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत खोटी माहिती दिल्याचा आरोप करून त्यांच्या माफीची मागणी केली होती. पण त्यानंतर भारतीय लष्कराच्या एडीजी पीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलासा करून त्या प्रकरणावर एकदाचा पडदा टाकला.

याच मुद्द्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘अग्निवीर’वरून देशाची दिशाभूल करू पाहणाऱ्या राहुल गांधींना अखेर आपल्या लष्करानेच सत्याचा आरसा दाखवला. किमान, देशाच्या सैन्यदलांना आणि भारत मातेच्या वीर सुपुत्रांना तरी आपल्या राजकारणासाठी इंधन म्हणून वापरू नका राहुलजी..! तथाकथित ‘मोहब्बत की दुकान’ला टाळं लावावं लागलं तर आता खोट्याची विक्री सुरू केलीय काँग्रेसने…”, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button