Breaking News : उन्मेश पाटील ठाकरे गटाचा एबी फॉर्म घेऊन मुंबईहून चाळीसगावकडे रवाना

Breaking News : चाळीसगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत असून, ठाकरे गटाने उन्मेश पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उन्मेश पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईहून चाळीसगावकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच पक्षाकडून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Breaking News : Unmesh Patil left for Chalisgaon from Mumbai with AB form of Thackeray group

भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून उन्मेश पाटील यांना तिकीट नाकारून स्मिता वाघ यांना संधी दिली होती. यामुळे नाराज होऊन पाटील यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. २०१४ साली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले पाटील, २०१९ मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी भाजपला राम-राम करून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून उन्मेश पाटील हे चाळीसगावमध्ये झपाटल्यागत कामाला लागले असून, त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम देखील केले आहे.

पाटलांची भाजप आमदारांच्या विरोधात रंगणार थेट लढत

ठाकरे गटाने चाळीसगावमधून उमेदवारी दिल्यानंतर उन्मेश पाटील यांची थेट लढत भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी होणार आहे. अर्थात, पाटील आणि चव्हाण यांच्यातील लढत संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी राहणार आहे. एकेकाळचे जीवलग मित्र लोकसभेच्या निवडणुकीपासून एकमेकांना पाण्यात पाहु लागले होते. विधानसभेच्या निवडणुकीत दोघेजण एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button