Breaking News : प्रवाशांना मोठा फटका बसणार; एसटीचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर..!

Breaking News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यस्तरीय बेमुदत बंद पुकारला आहे. हे आंदोलन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत वेतन वाढवण्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आले आहे. या संपामुळे राज्यातील एसटी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Breaking News : Passengers will be hit hard; ST employees on indefinite strike from today..!

एसटी महामंडळ हे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानले जाते. त्यामुळे या संपामुळे सामान्य जनतेचे हाल होणार हे निश्चित आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ग्रामीण भागातील प्रवासी मोठ्या संख्येने एसटी बसच्या माध्यमातून आपल्या गावी गणपतीच्या मूर्तींची स्थापना करण्यासाठी आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करतात. अशा स्थितीत हा संप त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर घालणारा ठरणार आहे.

सरकार आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये वेतन वाढीबाबत वारंवार चर्चा झाली असली, तरी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. कर्मचाऱ्यांचा असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि या असंतोषाचा परिणाम म्हणूनच त्यांनी संपाची हाक दिली आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन मिळायला हवे, जेणेकरून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. राज्य सरकारने या संपावर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे. जर वेतनवाढीबाबत योग्य तोडगा निघाला नाही, तर हा संप अधिक काळ चालू राहू शकतो, ज्यामुळे राज्यातील एसटी वाहतूक व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

नेमक्या काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ?

● सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा.
● महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी.
● चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या.
● इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा.
● सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा.
● वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.
● जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.
● विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.
● खाजगीकरण बंद करा.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button