Breaking News : परभणीत गणेश भक्ताचा डीजेच्या आवाजामुळे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू…!
धुळे जिल्ह्यात ट्रॅक्टरखाली तीन बालकांचा मृत्यू
Breaking News : परभणी जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्दैवी घटना घडली असून, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना जिंतुर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडली. मृत व्यक्ती व्यतिरिक्त आणखी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. खान्देशातील धुळे जिल्ह्यातही गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Breaking News : Parbhani Ganesha devotee dies of cardiac arrest due to DJ’s sound…!
परभणी जिल्ह्यातील सदर घटना मिरवणुकीच्या आनंदाला घालबोट लावणारी ठरली आहे. डीजेच्या जोरदार आवाजामुळे संबंधित व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकाचा मृत्यू झाल्यानंतर सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू असून स्थानिक प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे. गणेश विसर्जनाचा उत्सव साजरा करताना डीजेच्या आवाजामुळे घडलेली ही घटना नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारी ठरली आहे.
धुळे जिल्ह्यात ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू
धुळे शहरापासून जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा अपघात घडला आहे. ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. परी बागुल, शेरा सोनवणे, लड्डू पवार अशी मृत बालकांची नावे आहेत. हा अपघात ट्रॅक्टरवरील चालक बदलताना घडला, ज्यामुळे विसर्जनाचा आनंद दुःखात बदलला. या भीषण अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका व्यक्तीची स्थिती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे, तर प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे.