Breaking News : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अखेर ठरला; शरद पवारांचे सूचक विधान !

Breaking News : महायुतीच्या रिपोर्ट कार्ड सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आव्हान देत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, हे स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. यावर शरद पवारांनी सूचक प्रतिक्रिया देत तो विषय आमच्यासाठी संपला आहे, असे बोलून मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर अधिक बोलणे टाळले. याचा अर्थ असा घेतला जातो आहे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल हे ठरलेले आहे.

Breaking News : Mahavikas Aghadi’s Chief Ministerial candidate has finally been decided; Sharad Pawar’s indicative statement!

शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या शिवस्वराज्य यात्रेचे कौतुक करत म्हटले की, पाटील यांनी राज्यभरात ७,००० किमीचा प्रवास करत ७६ मतदारसंघांमध्ये जाऊन लोकांमध्ये आशा निर्माण केली आहे. ते म्हणाले, “आपले राज्य विकासाच्या बाबतीत मागे पडले आहे आणि पाटील यांनी त्यांच्या दौऱ्यातून लोकांना योग्य दिशा दाखवली आहे. पवारांनी पुढे सांगितलं की, जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्यासाठी सक्षम आहेत आणि त्यांच्या नेतृत्त्वात राज्याला एक नवीन दिशा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. पवारांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जयंत पाटील हेच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे काय ?

शरद पवार यांनी महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करत म्हटले की, मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला योग्य जागा दाखवून दिल्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारने विविध योजना आणल्या. या योजनांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचेही कौतुक केलं जात आहे. मात्र राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न पवारांनी विचारला. त्यांनी पुढे नमूद केलं की, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि या बाबतीत सरकार गंभीर नाही. महिलांच्या सुरक्षेवर ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे, असेही पवार म्हणाले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button