Breaking News : नार-पार योजनेसाठी चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन…!

Breaking News : नार-पार योजनेच्या अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीत आंदोलकांनी अर्धनग्न जलसमाधी आंदोलनास सुरूवात करून खळबळ उडवून दिली आहे. सध्या गिरणा पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असून, नदीच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतरही आंदोलक मागे हटलेले नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार उन्मेश पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे.

Breaking News : Jalasamadhi movement in Chalisgaon taluka for Nar-Par scheme in Girna river basin…!

नार-पार योजनेसाठी गिरणा पट्ट्यातील शेतकरी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहे. जोपर्यंत नार-पार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत गिरणा नदी पात्रात हे आंदोलन सुरूच राहणार असा पावित्र्य आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी अग्निशमक दलाची तुकडी तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आले आहे. मेहुणबारे पोलिस या आंदोलनावर नजर ठेवून आहेत.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने शिवसेना नेते व माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या आंदोलनाचा गंभीर पवित्रा लक्षात घेता हलगर्जीपणा करू नये, अशी मागणी उपस्थित आंदोलकांनी केली आहे. कारण हे आंदोलन ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय संपणार नाही, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे गिरणा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button