Breaking News : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ६५०० रुपयांची वाढ; संप मागे, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास…!

Breaking News : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा दीर्घकाळ चालू असलेला संप बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण घोषणेनंतर मागे घेण्यात आला. शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२० पासून मूळ वेतनात सरसकट ६५०० रुपये वाढ देण्याचे आश्वासन दिले. या घोषणेनंतर एसटी कामगार संयुक्ती कृती समितीने दुसऱ्या दिवशी संप मागे घेतल्याची घोषणा केली. संपाच्या पहिल्या दिवशी महामंडळाचा १५ कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी २२ कोटी रुपये, असा एकूण ३७ कोटी रुपयांचा महसूल बुडाला.

Breaking News : Increase in salary of ST employees by Rs.6500; Passengers breathed a sigh of relief as the strike was called off…!

मंगळवारपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बुधवारी थांबला. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी सदरचा संप सुरू होता. मुख्यमंत्र्यांनी संघटनांच्या कृती समितीची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचारी आंदोलन मागे घेण्याच्या मानसिकतेत आले. संपाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील २५१ पैकी ९४ आगारांचे कामकाज पूर्णपणे बंद होते. तर ९२ आगारांमध्ये अंशत: कामकाज सुरू होते. मराठवाड्यातील सर्वाधिक २६ आगारांचे कामकाज बंद होते. ६५ आगारांत मात्र सेवा सुरळीत सुरू होती. यामुळे लाखो प्रवासी अडकले होते आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या, सातवा वेतन द्या, महागाई भत्त्याची थकबाकी द्या, मागील करारातील त्रुटी दूर करा, शिस्त व आवेदन पद्धतीत बदल, मेडिकल कॅशलेस योजना लागू करा यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणी असलेल्या वेतनाच्या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. इतर मागण्यांवरही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, आंदोलनादरम्यान ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे त्यांच्यावरील कारवाईही मागे घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button