Breaking News : गिरीश महाजनांच्या करेक्ट कार्यक्रमाला सुरूवात; एकनाथ खडसे व दिलीप खोडपे राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल…!

Breaking News : जामनेर मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा घेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे संकटमोचक नेते मंत्री गिरीश महाजन यांना दोन मोठे धक्के आज शनिवारी दिले. पहिला धक्का म्हणजे भाजपचे जुने निष्ठावंत नेते दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आणि दुसरा धक्का म्हणजे आमदार एकनाथ खडसे भाजप प्रवेशाच्या वावड्यांना मूठमाती देऊन आज पुन्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले.

Breaking News : Girish Mahajan’s correct program begins; Eknath Khadse and Dilip Khodpe entered the NCP tent…!

महायुती सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा जामनेरमध्ये आयोजित केली होती. याठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव कांबळे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, जामनेर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या दिलीप खोडपे यांनी सभास्थळी वाजतगाजत मोठ्या जल्लोषात हजेरी लावून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. प्रसंगी तुतारी फुंकून राष्ट्रवादीमधील पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा रितसर पक्ष प्रवेश देखील पार पडला.

एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवर साधला निशाणा

माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने घरवापसीसाठी बरेच दिवस ताटकळत ठेवले होते. त्यामुळे खडसे यांनी आपण पुन्हा राष्ट्रवादीत परतणार असल्याचे संकेत मागच्या आठवड्यात दिले होते. प्रत्यक्षात भाजपकडून त्यानंतरही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर एकनाथ खडसेंनी आज जामनेरमध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित सभेला उपस्थित राहुन पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय झाल्याचा संदेश जनसामान्यांना दिला. यावेळी गुलाबराव देवकरांसह डॉ.सतीश पाटील व इतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button