Breaking News : १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता किमान १० हजार रुपये पेन्शन मिळणार…!

Breaking News : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एका महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन नवीन ‘एकीकृत पेन्शन’ योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार असून, यामुळे १ एप्रिल २००४ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह शेवटच्या १२ महिन्यांतील मूळ वेतनाच्या ५० टक्के किंवा किमान १० हजार रूपये पेन्शन मिळू शकणार आहे. १ मार्च २०२५ पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा फरकासह लाभ मिळेल.

Breaking News : Central employees who have completed 10 years of service will now get a pension of at least Rs. 10 thousand…!

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की नवीन यूपीएस पेन्शन योजना अंमलात आणताना केंद्र सरकारने आधीची ‘एनपीएस’ ही योजना बंद केलेली नाही. दोनपैकी एकीची निवड करण्याचे स्वातंत्र्य सरकारी कर्मचाऱ्याला असणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक सुवर्णसंधी ठरू शकते. या योजनेत फॅमिली पेन्शनची तरतूद असून, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अवलंबितास शेवटच्या पेन्शनच्या ६० टक्के पेन्शन मिळेल. ही तरतूद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा देईल. सध्याची राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) ही १ एप्रिल २००४ नंतर सरकारी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे. मात्र, या योजनेत ५० टक्के पेन्शनची हमी नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता. यूपीएस या योजनेत ही कमतरता दूर करण्यात आली आहे.

अशी आहेत नवीन ‘एकीकृत पेन्शन’ योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:

फॅमिली पेन्शन: कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अवलंबितास शेवटच्या पेन्शनच्या ६० टक्के पेन्शन मिळेल.
५० टक्के पेन्शनची हमी: कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांतील मूळ वेतनाच्या ५० टक्के पेन्शन मिळू शकणार आहे.
कर्मचारी आणि सरकारचे योगदान: कर्मचाऱ्यांकडून एनपीएसप्रमाणेच १० टक्के योगदान आणि सरकारचे योगदान १४ टक्क्यांवरुन १८.५ टक्के वाढवले आहे.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button