Breaking News : शौचास गेलेल्या ७ वर्षीय बालकाला नरभक्षक बिबट्याने झडप घालून केले ठार…!
Breaking News : दुर्गापूर तालुक्यातील न्यू सिनाळा गावात ७ वर्षीय भावेश तुराणकर या बालकाला बिबट्याने हल्ला करून उचलून नेल्याची खळबळजनक घटना घडली. घरासमोर शौचास बसलेला भावेश घराकडे परतत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली. अनेक तास शोध घेतल्यानंतर गावकऱ्यांना अखेर एका झाडाखाली भावेशचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. भावेश हा पहिलीच्या वर्गात शिकत होता.
Breaking News : A 7-year-old defecating boy was mauled to death by a man-eating leopard…!
भावेश हा बिबट्याने हल्ला करण्यापूर्वी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराच्या मागे शौचास बसला होता. बराच वेळ घरी न परतल्यामुळे आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला. काहींनी परिसरात बिबट्या दिसल्याचे सांगितले, त्यानंतर वनविभाग आणि दुर्गापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वाखाली रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली, अखेर रात्री भावेशचा मृतदेह सापडला. नंतर मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवला. भावेशच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे न्यू सिनाळा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावण्याची तयारी केली आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांत १५ नागरिकांना गमवावा लागला आपला जीव
दुर्गापूर आणि सीएसटीपीएस परिसराला ताडोबा जंगलाचा भाग लागून असल्याने येथे वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. वाघ, बिबट आणि अस्वल यांसारख्या प्राण्यांचे या भागात नियमितपणे दर्शन घडते. मागील तीन वर्षांमध्ये फक्त दुर्गापूर परिसरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये जवळपास १५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच आठवड्यात, चिंचोली (मूल तालुका) येथेही वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी ठार झाला होता. गुराखी आपल्या बकर्यांची चराई करत असताना वाघाने त्याच्यावर झडप घेतली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटना परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.