Breaking News : तळोदा तालुक्यात नातू व आजीचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर अडकला पिंजऱ्यात !

Breaking News : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात काजीपूर शिवारात नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नातू व आजीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली होती. श्रावण शिवज्या तडवी आणि साखराबाई खेमा तडवी यांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या तो बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Breaking News: The leopard that killed grandson and grandmother in Taloda taluka is finally stuck in a cage!

अतूल सुर्यवंशी यांच्या काजीपूर शिवारातील शेतात राखणदारी करण्याचे काम तडवी कुटुंब करते. मंगळवारी दुपारी साखराबाई तडवी ह्या शेळ्या चारण्यासाठी रानात गेल्या होत्या. बराच उशीर झाला तरी साखराबाई झोपडीकडे परतल्या नाही. तेव्हा त्यांचा नातू आणि मुलगी हे दोघे साखराबाईंच्या शोधासाठी निघाले. मात्र, वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रावणवर हल्ला चढवला आणि त्यास उसाच्या शेतात ओढत नेले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने व आजुबाजुच्या शेतातील ग्रामस्थांनी आरडाओरड केली. साखराबाईचा शोध घेतल्यावर तिचाही मृतदेह दुसऱ्या शेतात आढळून आला होता.

ज्या ठिकाणी श्रावणचा मृतदेह सापडला, त्याच ठिकाणी बिबट्या अडकला

दरम्यान, नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने ज्या ठिकाणी श्रावण तडवी या बालकाचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी मंगळवारी रात्री पिंजरा लावला. आतील शेळीला फस्त करण्यासाठी आलेला बिबट्या रात्री उशिरा अखेर त्या पिंजऱ्यात अडकला. बुधवारी सकाळी वन विभागाचे कर्मचारी पिंजऱ्याजवळ गेल्यानंतर त्यांना त्यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. काजीपूर शिवारात हा एकच बिबट्या नाही. अजून दोन-तीन बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानुसार त्यांनाही पकडण्यासाठी आणखी पिंजरे लावले जातील, असे वन विभागाने सांगितले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button