Breaking News : मोठी बातमी…दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार सुरु !
Breaking News : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2024-25 शैक्षणिक वर्षातील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या घोषणेनुसार, बारावीची परीक्षा यंदा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहेत, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहेत.
Breaking News : Big news…10th and 12th exams will start from ‘this’ date!
दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र- SSC) आणि बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र – HSC) परीक्षा दरवर्षी पुणे तसेच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते, तर दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते. या परीक्षांचा निकाल ऑनलाइन पद्धतीने घोषित केला जातो, ज्यामध्ये बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस आणि दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन सोयीचे व्हावे आणि त्यांच्यावरचा ताण कमी होण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या नियोजित तारखा जाहीर केल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि लेखी परीक्षांचे सविस्तर विषयवार वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करून दिले जाईल. या घोषणेने विद्यार्थी आणि शिक्षकांना परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक वेळेचे नियोजन करण्यास मदत होईल. परीक्षांसाठी सखोल तयारी करताना वेळापत्रक विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यास करण्याची संधी देईल.