Breaking News : महाराष्ट्रात ‘या’ तारखेला विधानसभेची निवडणूक ? मोठी अपडेट आली समोर !

Breaking News : महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक नेमकी आहे तरी कधी, निवडणूक दिवाळीच्या आधी होईल की दिवाळीनंतर आणि आचारसंहिता कधी लागणार, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, राज्यातील विधानसभेच्या आगामी निवडणुकीची मोठी अपडेट समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली आहे.

Breaking News: Assembly election in Maharashtra on ‘this’ date? A big update has come!

प्राप्त माहितीनुसार, राज्यातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्याची शक्यता असून विविध राजकीय पक्ष त्यासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत. राज्यभरात वेगवेगळ्या पक्षांच्या सभा, दौरे आणि बैठका सुरू झाल्या आहेत. ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तरीही नव्या विधानसभेसाठी नागरिकांना अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण ऑक्टोबर महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते तर तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतमोजणी होईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत कोणते मुद्दे प्राधान्याने चर्चेत येतील, कोणते पक्ष यशस्वी ठरतील आणि सत्ता काबीज करतील, याची मततदारांमध्येही उत्सुकता आहे. राजकीय घडामोडींनी राज्यातील वातावरण दिवसेंदिवस चुरशीचे बनत चालले आहे.

महायुतीकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजनांची बरसात

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील पक्ष विधानसभा निवडणुकीतही अधिक आक्रमकपणे प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्याने महायुतीनेही आपली रणनीती बदलली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून लाडकी बहीण आणि लाडका भाऊ, यासारख्या काही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभर दौरे करताना दिसत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेल्या योजनांच्या व्यावहारिकतेवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button