Breaking News : प्रस्तावित जालना ते जळगाव रेल्वे मार्गावर असेल देशातील सर्वात लांब बोगदा…!
Breaking News : केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. १७४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावर देशातील सर्वात मोठा बोगदा तयार केला जाणार आहे, ज्याची लांबी सुमारे २३.५ किलोमीटर एवढी राहणार आहे. बोगदा तयार करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Breaking News: The proposed Jalna to Jalgaon railway line will be the longest tunnel in India!
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जालना ते जळगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गावर देशातील सर्वात मोठा बोगदा बांधला जाणार आहे. या १७४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, ज्यासाठी सुमारे ७,१०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचे महत्त्व सांगताना मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले की, हा मार्ग जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ पर्यटनस्थळांना जोडणार आहे. ज्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांसाठी या ऐतिहासिक स्थळांना भेट देणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
व्हाया जळगाव गुजरात जाण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग सोयीचा ठरणार
येत्या पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असून, या रेल्वेमार्गामुळे खान्देश तसेच मराठवाड्यातील उद्योजकांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे. जहाजांमध्ये मालवाहतूक करण्यासाठी या रेल्वेचा वापर करता येईल. यामुळे जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव हे जिल्हे रेल्वेने एकमेकांशी जोडले जातील. परिणामी, या भागातील आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल, असे बोलले जात आहे. मराठवाड्यातून व्हाया जळगाव गुजरात राज्यात जाण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग विशेष सोयीचा ठरणार आहे.