Breaking News : खान्देश-मराठवाडा जोडणाऱ्या जालना ते जळगाव ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला केंद्राकडून ग्रीन सिग्नल !

Breaking News : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने आठ नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या नव्या रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. १७४ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असून, या मार्गासाठी अंदाजित ७ हजार १०६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ५० टक्के वाटा केंद्र सरकार आणि ५० टक्के राज्य सरकार उचलणार आहे.

Breaking News: Green signal from Jalna to Jalgaon broad gauge railway connecting Khandesh-Marathwada!

जालना ते जळगाव या नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे अजिंठा लेण्यांपर्यंत जाणे आता अधिक सोयीचे होणार आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे ६० लाख लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, ज्यासाठी ९३६ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. ५४ कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जनात घट होईल. या रेल्वेमुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि गुजरात यांच्यातील संपर्क अधिक सोपा होईल. याशिवाय ओडिशा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्येही नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

जालना-जळगाव रेल्वेमार्गावर ही प्रमुख स्थानके असतील

येत्या ५ वर्षांत जळगाव ते जालना या रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावर जळगाव, पहूर, अजिंठा, सिल्लोड, भोकरदन आणि जालना अशी स्थानके असतील. त्यामुळे मराठवाडा आणि खान्देशातील प्रवास अधिक सोयीचा होईल. जळगावसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड परिसरातही औद्योगिक विकासाला यामुळे मोठा हातभार लागेल, असे बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button