Breaking News :बच्चू कडुंचा महायुतीवर ‘प्रहार’; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी ?

Breaking News : महायुतीवर बऱ्याच दिवसांपासून नाराज असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू हे अचानक पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बच्चू कडू आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनीही माध्यमांशी बोलताना दुजोरा दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार का असे विचारल्यावर मी काहीही निर्णय घेऊ शकतो, असे सूचक विधान देखील बच्चू कडू यांनी केले आहे. दोघांच्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

Breaking News: Bachu Kadu’s ‘attack’ on Mahayuti; Sharad Chandra Pawar joined hands with NCP?

दरम्यान, “माझ्यासाठी अपंग, शेतकरी आणि मजुरांचे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. या समस्या सोडविणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी मी कोणतेही कठोर निर्णय घेण्यास तयार आहे. या मुद्यावर आधारितच मी कोणाच्या सोबत जायचे याचा निर्णय घेईन,” असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. “एक सप्टेंबरपर्यंत कोणतीही ऑफर आली तरी मी निर्णय घेणार नाही. शरद पवार आणि इतर पक्षांच्या या मुद्यावरच्या भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केले बच्चू कडू यांचे कौतूक

खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “कष्टकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते आहेत. राजकीय मतभेद हे लोकशाहीचा एक आवश्यक भाग आहेत, परंतु बच्चू कडू यांच्या समाजसेवेसाठी केलेल्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी बच्चू कडू लाडके भाऊ होणार का, हा सवाल करण्यात आल्यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांनाच विचारा असे म्हणत मिश्किल उत्तर दिले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button