Breaking News : जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढणार ?

Breaking News : विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून मोठी अपडेट समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट या जागेवर दावा सांगून जोरदार तयारी करत असल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात शिवसेना ठाकरे गटाने जळगावच्या जागेवरील दावा सोडल्याचे खळबळजनक वृत्त येऊन धडकले आहे. अशा स्थितीत इतक्या दिवसांपासून उमेदवारीसाठी धडपड करत असलेल्या इच्छुकांसमोर आता करावे काय, असाही प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Breaking News: Former mayor of Jalgaon Jayashree Mahajan Sharad Chandra Pawar will contest assembly elections from NCP?

विधानसभेचा जळगाव शहर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपानुसार राष्ट्रवादीकडेच आहे. परंतु, मागच्या काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला या जागेवर अपेक्षित यश मिळू न शकल्याने यावेळी ही जागा उबाठाला सोडण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यादृष्टीने उबाठाकडून माजी महापौर जयश्री महाजन तसेच माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे तयारीला लागले होते. पक्षश्रेष्ठींची मनधरणी करून जळगावची उमेदवारी पदरात पाडण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून मोर्चेबांधणीर भर देण्यात आला होता. मात्र संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जळगावची जागा लढणे आणि जिंकणे शिवसेना ठाकरे गटासाठी वाटते तितके सोपे नसल्याचा सूर निघाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ज्यांना कोणाला अन्य दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवायची असेल त्यांच्यासाठी आमची कोणतीच आडकाठी नसेल, असेही संपर्क प्रमुखांकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

माजी महापौर जयश्री महाजन यांना आधीच होती कल्पना ?

जळगावच्या जागेवरीला दावा शिवसेना ठाकरे गटाने सोडल्यानंतर इच्छुकांसमोर अन्य दुसऱ्या पक्षांचा पर्याय शोधण्याचे मोठे आव्हान आता आहे. त्यादृष्टीने संबंधितांनी चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुद्धा आहे. दरम्यान, जळगावच्या जागेवरील दावा उबाठा ऐनवेळी सोडू शकते किंवा दावाच करणार नाही, याची कल्पना माजी महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना होती. त्यामुळेच त्यांनी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीसोबतचा सुसंवाद बऱ्याच महिन्यांपासून कायम ठेवला होता, असे आता बोलले जात आहे. तसे पाहिले तर महाजन दाम्पत्य हे खूप आधीपासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जवळीक साधून आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा केव्हा जळगाव दौऱ्यावर आले आहेत, तेव्हा जयश्री महाजन स्वतः त्यांच्या स्वागतासाठी सर्वांच्या पुढे असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी शरद पवारांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देखील महाजन परिवाराने दिले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये निष्ठावंतांच्या मेळाव्यासाठी जळगावात आले होते. तेव्हाही जयश्री महाजन यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे जयश्री महाजन ह्या थेट राष्ट्रवादीत सहज प्रवेश करून जळगावची विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी देखील चर्चा आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button