Breaking News : ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीतून संन्यास घेण्याचा धक्कादायक निर्णय !
Breaking News : ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या विनेश फोगाटचे वजन १५० ग्रॅमने जास्त भरल्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर विनेशने कुस्तीतून संन्यास घेतल्याचे जाहीर केले आहे. तिने संन्यास घेण्याची घोषणा अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी पोस्टमधून केली आहे. विनेशने या पोस्टमध्ये कुस्तीला अलविदा करताना आपली भावना व्यक्त करून सर्वांना मोठा धक्का दिला आहे.
Breaking News: Vinesh Phogat’s shocking decision to retire from wrestling after being disqualified from the Olympics!
विनेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “कुस्ती स्पर्धा आपल्याला आईसारखी आहे. आज मी कुस्तीशी हरले.” तिच्या ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचे स्वप्न केवळ १५० ग्रॅम वजनाच्या फरकामुळे तुटले. अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या विनेशला वजन जास्त असल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आणि तिचे स्वप्न भंगले. या घटनेनंतर निराश झालेल्या विनेशने कुस्तीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
विनेशने वजन कमी करण्यासाठी केस कापले, नखे कापली, रक्तही काढले !
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकच्या स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने भारताची मान गर्वाने उंचावली होती. तिच्या देहबोलीतून ती जणू सांगत होती की, “तयारी करा, मी सुवर्ण पदक आणते आहे.” उपांत्य फेरीत ५-० च्या फरकाने विजय मिळवून तिने आपल्या प्रतिस्पर्ध्याला साधा एक गुणही मिळू दिला नाही. तिच्या या पराक्रमाने आणि आत्मविश्वासाने जवळपास प्रत्येक भारतीयाला खात्री वाटली होती की, विनेश गोल्ड मेडल आणणारच. विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. तिच्या या अद्वितीय कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला. परंतु, अंतिम फेरीच्या थ्रिलरच्या आधीच एक अनपेक्षित आणि वेदनादायक निर्णय आला. विनेशचे वजन १५० ग्रॅमने जास्त निघाले आणि त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. मंगळवारी रात्री विनेशला जेव्हा समजले की तिचे वजन ५२ किलो आहे. तेव्हा तिने वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. जॉगिंग केले, दोरीवरच्या उड्या मारल्या, सायकलिंग देखील केले. केस कापले, नखे कापली, रक्तही काढले तरीही तिचे वजन १५० ग्रॅम जास्त भरले.