Breaking News : मोठी बातमी; राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या शनिवारी जमा होणार ४ हजार रुपये…!
Breaking News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्या शनिवारी (ता.०५ ऑक्टोबर) राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सुमारे ४ हजार रुपये जमा होणार आहेत. या रकमेचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून, ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
Breaking News : 4 thousand rupees will be deposited in the bank account of the farmers of the state tomorrow on Saturday…!
पी.एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत अनुक्रमे १८ वा आणि ५ वा हप्ता वितरित होणार आहे. हा समारंभ शनिवारी सकाळी ११.०० वाजता वाशिम येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
पी.एम. किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ पासून केंद्र शासनाने सुरू केली असून, या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये, तीन समान हप्त्यांत दिले जातात. या योजनेद्वारे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील जवळपास १.२० कोटी रूपये शेतकरी कुटुंबांना १७ हप्त्यांमध्ये ३२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. यंदा शेतकऱ्यांना १८ वा हप्ता मिळणार आहे. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असून, त्यांच्या खात्यात या दिवशी ४ हजार रुपये जमा होणार आहेत.
केंद्र शासनाच्या पी.एम. किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण ९१.५२ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १९०० कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून २००० कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.