Breaking News : अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू; असे घडले तरी काय ?

Breaking News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेनंतर मिटकरी हे अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात असताना, मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. त्यात सहभागी असलेल्या जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Breaking News : Death of MNS activist who smashed Amol Mitkari’s car; What if this happens?

मनेस प्रमुख राज ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे भडकलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर अकोल्यात हल्ला चढवला. या हिंसक घटनेत मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचाही सहभाग होता. या घटनेनंतर मालोकार यास छातीत तीव्र वेदना जाणवल्याने तात्काळ अकोला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याला पुन्हा तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे दुर्दैवी निधन झाले.

अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले जय मालोकरच्या निधनाबद्दल दुःख

अकोल्यात झालेल्या या हिंसक प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील 12 अद्याप फरारच आहेत. या घटनेनंतर हदयविकाराचा झटका आलेला मनसे कार्यकर्ता जय मालोकार यास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यास आणखी दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानाच्या भोवती पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल मिटकरी यांनी स्वतः खेद व्यक्त केला असून, ते लवकरच जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना भेट देणार असल्याचे सांगितले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button