Breaking News : पश्चिम महाराष्ट्र हादरला; कोयनानगर, चिपळूण परिसराला २.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का !

Breaking News : मराठवाड्यातील परभणीसह हिंगोली, नांदेड तसेच विदर्भातील वाशीम जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात ४.५ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आज बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातील कोयनानगर व चिपळूण तालुक्यातील पोफळी, अलोरे परिसराला दुपारी ३.२६ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली.

Breaking News : West Maharashtra shook; 2.8 Richter scale earthquake shocks Koynanagar, Chiplun area!
प्राप्त माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या पश्चिमेला १० किलोमीटरवर आणि १५ किलोमीटर खोलीवर होता. सदरचे ठिकाण हे कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनाने दिला. कोयना धरण परिसरात लहान-मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका अधुनमधून सुरूच असते. त्यातील सौम्य धक्के बऱ्याचवेळा जाणवत सुद्धा नाहीत. या अगोदर २८ जानेवारी रोजी धरण परिसरात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू धरणापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर होता, असे सांगण्यात आले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button