Breaking News : लग्नात विघ्न; नदीत पूल नसल्याने वऱ्हाडींनी नवरदेवाला उचलून घेतले थेट खांद्यावर !

Breaking News : भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असला तरी, सातपुड्याच्या दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींपर्यंत अजुनही विकास पोहोचलेला नाही. त्या भागातील रहिवाशांना अजुनही रस्त्यांसह अन्य बऱ्याच सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्यामुळे आदिवासींना खूपच हाल सहन करावे लागतात. दोन गावांचा संपर्क तुटल्याने प्रसंगी तारेवरची कसरत सुद्धा करावी लागते. त्याचा प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यात व्हायरल झालेल्या लग्न कार्याच्या व्हिडीओतून आला आहे.

Breaking News : as there was no bridge in the river, the bridegroom lifted directly on his shoulder!
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वहेगी गावातून बारीपाडा गावाकडे जाणारा रस्ता देवनदीच्या पात्रातून जातो. मात्र, दरम्यानच्या रस्त्यावर नदीवर पूल नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना विशेषतः पावसाळ्यात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्याची प्रचिती यंदाच्या पावसाळ्यातही येत असताना गावातील एका लग्न कार्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीना चक्क नवरदेवाला खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागला. वऱ्हाडी मंडळी नवरदेवाला खांद्यावर घेऊन पाण्यातून मार्ग काढत असल्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल सुद्धा झाला आहे.

आता तरी नंदुरबारच्या जिल्हा प्रशासनाला व राज्य सरकारला जाग येईल का, पाड्यांवर वस्ती करून राहणाऱ्या आदिवासींच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचा मार्ग सुकर होईल का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. शासन आदिवासींच्या कल्याणासाठी दरवर्षी हजारो कोटी रूपये खर्च करते. परंतु,व्यवस्थित नियोजन होत नसल्याने आदिवासींना त्याचा लाभ मिळतच नाही. लोकप्रतिनिधी देखील आपला स्वार्थ साधण्यासाठी तेवढे प्रयत्नशील असतात. त्यांना दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींची थोडीही कीव वाटत नाही, असे बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button