मोठी बातमी…जळगावच्या विमानतळावर प्रशिक्षणार्थी विमान घसरले; जीवित हानी नाही !
जळगाव । शहरातील विमानतळावर आज बुधवारी (ता.19) एक प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरल्याची खळबळजनक घटना घडली. सदरच्या अपघात सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कसार यांनी स्वतः त्यासंदर्भात अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. ( Breaking News )
जळगाव येथील विमानतळावरून गोवा तसेच हैदराबाद आणि पुणे येथे जाण्यासाठी थेट विमानसेवा नुकतीच सुरू झालेली आहे. याशिवाय आता मुंबईसाठी नव्याने विमानसेवा सुरू करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जळगावच्या विमानतळाला त्यामुळे खूप मोठे महत्व देखील प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय नकाशावर सुद्धा जळगावचे विमानतळ ठळकपणे दिसू लागले आहे. दरम्यान, प्रवासी विमानांशिवाय प्रशिक्षणार्थी विमानांच्या उड्डाणांसाठीही जळगावच्या विमानतळावर स्वतंत्र धावपट्टी सोय आहे. अशाच धावपट्टीवर आज बुधवारी एक प्रशिक्षणार्थी विमान घसरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. सदरच्या घटनेबाबत सविस्तर माहिती अद्याप कळू शकलेली नाही, संपूर्ण माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.