हिंदी महासागर वेगाने तापू लागल्यामुळे भारत देशाला तापमान वाढीचा मोठा धोका !
Jalgaon Today : पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (IITM) तसेच ऑस्ट्रेलियातील CSIRO, अमेरिकेतील प्रिंसेटन युनिवर्सिटी, फ्रान्समधील सॉर्बोने विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठ यांच्याकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. वाढत्या कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे महासागरांचे तापमान वाढते आहे, त्यात हिंदी महासागर देखील आहे. त्यामुळे भारत देशाला तापमान वाढीच्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. (Breaking News)
या संशोधनातून गेल्या कित्येक दशकांपासून महासागरांच्या तापमानात कशी आणि किती वाढ झाली आहे, हे तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 1950 ते 2020 या काळात महासागरांचे तापमान हे दर शतकाला 1.2 अंश सेल्सिअस एवढे वाढत आहेत. सन 2100 या वर्षांपर्यंत हा दर 3.8 अंश सेल्सियस इतका वाढण्याची भीती आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम हा सजीवांना भोगावा लागणार आहे. पाण्याची पातळी जर वाढली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात भूभाग हा पाण्याखाली येऊ शकतो त्याचप्रमाणे समुद्राचे तापमान वाढल्यामुळे आतील जैवविविधता देखील नष्ट होण्यास सुरूवात होईल. त्यामुळे ही मोठी धोक्याची घंटा आहे.
संशोधनानुसार, हिंदी महासागराचे 2,000 मीटर खोलीवरील तापमान हे दर दशकाला 4.5 झेटा-ज्यूल या वेगाने वाढते आहे. ते जर का असेच वाढत राहिले तर हे प्रमाण वाढून तब्बल 16-22 झेटा-ज्यूल प्रतिदशक होईल. 239 बिलियन टन TNT चा मोठा विस्फोट झाल्यानंतर जेवढी एनर्जी तयार होईल, ती एनर्जी म्हणजे झेटा-ज्यूल आहे. म्हणजे विचार करा येत्या काही दशकात जर का हे तापमान असेच वाढत राहिले तर काय होईल?