चेट्री चंड्र मिरवणुकीत भाजपा युवा मोर्चाचा जोर वाढताच उबाठा गटाने घेतला काढता पाय
BJP Yuva Morcha : जळगाव शहरात सिंधी बांधवांतर्फे चेट्री चंड्र निमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये बुधवारी (ता.10) राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला. शोभायात्रेत उबाठा गटाचे उमेदवार करण पवार हे सुद्धा सहभागी झाले होते. मिरवणूक जी.एम फाउंडेशनच्या पुढे सरकल्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रभारी अरविंद देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्यासह सर्व युवा मोर्चाचे शंभरहुन अधिक कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. त्यानंतर मात्र उबाठा गटाने काढता पाय घेतला.
चेट्री चंड्रचे दर्शन घेतल्यानंतर उबाठा गटाच्या उमेदवारासह सात ते आठ लोकच मिरवणुकीत सहभागी झाले होते. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची संख्या अचानक वाढल्याने उबाठा गटाच्या उमेदवारांनी मिरवणुकीतून माघार घेतली. त्याची चर्चा आज दिवसभर जळगाव शहरात होती. एकंदरीत आज जळगाव शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच उबाठाच्या उमेदवारांना मात दिल्याचे बोलले जात आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अमित भाटीया, प्रभारी अरविंद भाऊ देशमुख, भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेश भाऊ पाटील, सरचिटणीस जितेंद्र चौथे, विकास सोनार, सागर जाधव, अक्षय जेजुरकर, माजी नगरसेवक मयूर भाऊ कापसे, गजानन वंजारी, उपाध्यक्ष अश्विनभाऊ सैंदाणे, योगेश बागडे, सतनाम सिंग बावरी, राहुल पाटील, गौरव ढेकळे, चिटणीस हर्षल चौधरी, गौरव पाटील, कल्पेश भोईटे, सोशल मीडिया प्रमुख मयूर भदाणे, सहसोशल मीडिया प्रमुख आर्यन शेठ, संकेत शिंदे, दर्शन सोनवणे, समर्थ राणे, मंडळ क्रमांक ९ चे अध्यक्ष मयूर ठाकरे, मयूर जोशी,धीरज पोरोहित इतर पधाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.