जळगावमध्ये भाजपा युवा मोर्चातर्फे ‘नमो युवा चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन

BJP Yuva Morcha : जळगाव शहरात भाजपा युवा मोर्चातर्फे ‘नमो युवा चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामाध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा तसेच केंद्रातील विविध योजनांची माहिती युवा वर्गाला देण्यात आली.

“आजचे युवा हेच या देशाचे भविष्य असणार आहेत आणि सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात त्यांचे खूप मोठे योगदान असणार आहे,” असे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले. याशिवाय युवा मोर्चाचे सरचिटणीस विकास सोनार यांनी सर्व योजनांची माहिती संक्षिप्तपणे युवा वर्गाला दिली. पुढील दोन दिवसात हा कार्यक्रम पूर्ण जळगाव शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणार आहे. त्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित जळगाव शहरातील नमो युवा चौपाल कार्यक्रमाला युवा मोर्चाचे सरचिटणीस गजानन वंजारी, उपाध्यक्ष योगेश बागडे, गौरव ढेकळे, रोहित सोनवणे, चिटणीस स्वप्निल भांडारकर व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button