चाळीसगावमध्ये ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या उपस्थितीने सखींच्या उत्साहाला उधाण

भाजपच्या नारीशक्ती वंदन सोहळ्यात बचत गटाच्या महिलांचा सन्मान

BJP Narishakti Vandan : चाळीसगावमध्ये भाजपच्या नारी शक्ती वंदन कार्यक्रमाअंतर्गत तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या पर्वावर खासदार उन्मेशदादा पाटील व उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.संपदाताई पाटील यांच्या माध्यमातून शिवस्तुती व शिवतांडव सामूहिक पठण, बचत गटातील महिलांचा स्त्री शक्ती सन्मान सोहळा राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या उपस्थितीने सखींच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.

कार्यक्रमाला जय मल्हार मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे यांच्यासह योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख नगरसेवक घृष्णेश्वरतात्या पाटील, जि. प. सदस्या मंगलताई जाधव, नगरसेविका विजयाताई पवार, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती भाऊसाहेब पाटील, डॉ.अल्केश पाटील, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ.सुनीता घाटे, पं. स. सदस्य दिनेशभाऊ बोरसे, रवीभाऊ चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, आरोग्य अधिकारी डॉ. निकिता नगराळे, रिल्सस्टार मयुरीताई पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस जितेंद्र वाघ, गिरीश बऱ्हाटे, किसान मोर्चाचे देवेंद्र पाटील, दिव्यांग तालुकाध्यक्ष पुंडलिक पाटील, उमेद क्लस्टर समन्वयीका रेखाताई महाले, नीलेश पाटील, सतीश बिल्लारे, गोपाळ शिवरकर, संतोष तेलंगे, राज महाजन, वाल्मीक महाले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारत माता, मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर तालुक्यातील उमेद अभियान अंतर्गत सीआरपी, एफआयसीआरपी, पशु सखी, बँक सखी, कृषी सखी, सीटीसी वर्धिनीताई, ग्रामसंघ पदाधिकारी, प्रभाग संघ पदाधिकारी महिला भगिनींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, अभिनेत्री सुरभी हांडे यांनी उमेद सखींशी खुला संवाद साधला.

समाजातील खऱ्या नायिकांना भेटल्याचा आनंद : सुरभी हांडे
याप्रसंगी जय मल्हार मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे यांनी उमेद अभियानातील सखींशी खुला संवाद साधताना म्हणाल्या की, “मी पडद्यावरची नायिका असले तरी मला गाव तांडा वस्तीमध्ये जावून माता भगिनींना आर्थिक सक्षम करणाऱ्या खऱ्या नायिकांना भेटल्याचा आनंद आहे. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार उन्मेशदादा आणि संपदाताई पाटील यांचे आभार मानते.”

स्त्री शक्तीचा अभूतपूर्व जागर होत असल्याचा अभिमान : संपदाताई पाटील
“ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी, यासाठी बचत गटाच्या माध्यमातून नारीशक्तीने गाव, तांडा वस्तीपर्यंत आर्थिक साक्षरतेचा चंग बांधला आहे. आपल्या संसाराच्या रहाटगाडग्यातून अधिकाधिक वेळ काढून सर्व महिला शक्तीने एकमेकांना सोबत घेऊन मोठी क्रांती केली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या नारी शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी नारीशक्ती वंदन अभियान राबविण्याचे आव्हान केले होते. या अनुषंगाने स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी आज स्त्री शक्ती वंदन कार्यक्रमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, शिवमय वातावरणात स्त्री शक्तीचा अभूतपूर्व जागर होत असल्याचा अभिमान आहे,” अशी भावना सौ. संपदाताई पाटील यांनी व्यक्त केली.

महिलांनी वेळोवेळी धरला ठेका
यावेळी उमंग सृष्टी परिवाराच्या शिवकन्यांनी शिवतांडव नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आली. हजारो महिलांनी एकासुरात शिवस्तुती पठण केल्याने वातावरण भावनिक झाले होते. गौरक्षा वाद्यवृंदाने सुरेल गीते सादर केली. त्यावर महिलांनी वेळोवेळी ठेका धरत या खुल्या व्यासपीठाचा आनंद घेतला. यावेळी उमंग सृष्टी परिवाराच्या अध्यक्षा साधनाताई पाटील, सिमरन मंदांनी,मायादिदी शर्मा, वैशाली पाटील, अर्चना चौधरी, सुवर्णाताई राजपूत, मेनका जंगम,महानंदा पटलकर, कविता पाटील, प्रतिभा पाटील, माधुरी वाघ, वर्षा शेंडे, ज्योती बडगुजर, मनीषा शेजवळकर, आरस्ता माळतकर, विजया पाटील, उज्वला अमृतकर, अर्चना निकुंभ उपस्थित होत्या. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सुनीता घाटे यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी युवा कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे मॅडम व अर्जुन परदेशी यांनी केले. तर आभार माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे यांनी मानले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button