केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जळगाव दौऱ्याची जय्यत तयारी, युवा मोर्चाची नियोजन बैठक

BJP Jalgaon : जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर येत्या 5 मार्चला होणाऱ्या युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्याअनुषंगाने पूर्व नियोजन व युवा चौपाल कार्यक्रमासंबंधी जिल्हा महानगरची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित बैठकीस महानगर जिल्हाध्यक्षा उज्वलाताई मोहन बेंडाळे, सरचिटणीस महेश जोशी, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, विकास सोनार, सागर जाधव, मयूर कापसे, गजानन वंजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपा युवा मोर्चा महानगर अध्यक्ष महेश पाटील यांनी युवा संवाद कार्यक्रमासाठी सागर पार्क कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणाऱ्या हजारो युवकांची गैरसोय होऊ नये म्हणून काय आणि कोणत्या उपाययोजना करता येतील, त्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच युवा संवाद कार्यक्रमास जास्तीतजास्त युवकांनी उपस्थित राहावे म्हणून सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,असेही आवाहन केले. महानगर जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांनी युवा संवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपापली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याची सूचना केली. बैठकीचे सूत्रसंचालन अक्षय जेजुरकर यांनी केले तर सागर जाधव यांनी आभार मानले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button