जळगावमध्ये भारतीय जनता पार्टीचा 44 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
चांगदेवचे 94 वर्षीय कार्यकर्ते नारायणराव चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण
BJP Jalgaon | जनसंघ ते भाजपा, असा प्रवास करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा 44 वा स्थापना दिवस आज शनिवारी (ता.06) शहरातील वसंत स्मृती तसेच जी.एम. फाउंडेशनच्या कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी चांगदेव (ता.मुक्ताईनगर) येथील भाजपाचे 94 वर्षीय कार्यकर्ते नारायणराव चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील झाले.
जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवतिर्थ मैदानासमोरील पक्षाच्या जीएम फाउंडेशन कार्यालयातील पहिल्या ध्वजारोहणाचा मान भारतीय जनता पार्टीचे 94 वर्ष वय असलेले जेष्ठ कार्यकर्ते नारायणराव चौधरी यांना मिळाला. शुक्रवारी रात्री त्यांना ध्वजारोहणाचे आमंत्रण मिळाल्यानंतर आज शनिवारी सकाळीच ते साडेपाचच्या बसने प्रवास करून कार्यक्रमस्थळी पोहोचले. आजवरच्या पार्टीच्या खडतर प्रवासाचा त्यांनी अतिशय मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांसमोर आढावा घेतला. तसेच आजच्या परिस्थितीत स्वतःच्या स्वार्थाकरता वेळोवेळी होणाऱ्या पक्षांतराबाबत दुःख व्यक्त करून निष्ठेशी प्रतारणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुचक सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी उदय भालेराव, मुकुंद मेटकर, भाग्यश्री चौधरी, सुभाष चौधरी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार चंदू पटेल, प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस अमित भाटिया, अरविंद देशमुख, सुनील खडके, प्रकाश बालानी, कैलास सोनवणे, शक्ती महाजन, विरन खडके, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर सोनवणे, गोपाल पोपटानी, जितेंद्र मराठे, भारती सोनवणे, सीमा भोळे, सुचिता हाडा, रेखा वर्मा, ज्योती निंभोरे, भैरवी वाघ-पलांडे, दीप्ती चिरमाडे, रेखा कुलकर्णी, रंजना वानखेडे, मीनाक्षी पाटील, छाया सारस्वत, सरोज पाठक, जयश्री पाटील, केतकी पाटील, रेखा पाटील, कांचन सोनवणे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, प्रदीप रोटे, योगेश पाटील, वंदना पाटील, चित्रा मालपाणी, भगत बालानी, आनंद सपकाळे, जयेश ठाकूर, अमित देशपांडे, मयूर कापसे, महेश पाटील, शोभा कुलकर्णी, अशोक कोष्टी, संजय शिंदे, राहुल घोरपडे, महादू सोनवणे यांचेसह पक्षाच्या विविध आघाड्या, मोर्चा, प्रकोष्ठ यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.