Ladaki Bahin Yojana : मोठी बातमी; महायुतीचे सरकार विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करणार…!

माजी गृहमंत्र्यांच्या दाव्याने उडाली खळबळ

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि राज्यभरातील १ कोटीपेक्षा अधिक महिलांना योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता या योजनेबाबत एक खळबळजनक दावा केला आहे.

Big News; The Mahayuti government will stop the Ladaki Bahin Yojana after the assembly elections…!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी “लाडकी बहीण” योजनेवर गंभीर आरोप करत राज्य सरकारच्या धोरणावर तीव्र टीका केली आहे. देशमुख यांनी असाही दावा केला आहे की, या योजनेसाठी राज्य सरकारने आदिवासींच्या बजेटमधील निधी कमी करून आणि नगरपालिका व महानगरपालिका विकास निधी वळवला आहे. त्यांच्या मते, हे सर्व पैसे राज्य सरकारने अनावश्यकपणे वापरले आहेत. देशमुख यांनी आपल्या आरोपांमध्ये असेही म्हटले आहे की, नगरपालिकेच्या सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांना या आर्थिक व्यवहारांबाबत विचारले पाहिजे. त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेला ‘लाडकी खुर्ची योजना’ असे संबोधले आहे. तसेच त्यांनी सरकारवर फक्त मतांसाठीच ही योजना आणली असल्याचा आरोप केला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित

विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण ही योजना बंद होईल आणि योजनेचे लाभार्थी असलेल्या महिलांची फसवणूक होईल. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, या आरोपांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेबद्दल नागरिकांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button