Bhusawal News : गुरूवारच्या ब्लॉकमुळे बडनेरा-नाशिक मेमू रद्द; महाराष्ट्र एक्सप्रेस सुद्धा होईल लेट…!

Bhusawal News : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळंब ते शेगाव दरम्यानच्या अंतरात प्रस्तावित असलेल्या कामांसाठी प्रशासनाने गुरूवारी (ता.०८) एका दिवसाचा ब्लॉक घेतला आहे. याकारणाने भुसावळ ते वर्धा तसेच बडनेरा ते नाशिक या दोन्ही मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र एक्सप्रेससह अन्य तीन गाड्या विविध स्थानकांवर अर्धा तास ते दीड तास थांबवून ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी माहिती घेऊन घराबाहेर पडावे.

Bhusawal News : Badnera-Nashik MEMU canceled due to Thursday block; Maharashtra Express will also be late!

संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविक विशेषतः गुरूवारी शेगावला मोठ्या प्रमाणात जातात. मात्र, नेमका गुरूवारी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रेल्वेने शेगाव जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. बडनेरा ते नाशिक मेमूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही हाल होण्याची चिन्हे आहेत. जळंब ते शेगाव दरम्यानच्या कामांसाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे भुसावळ ते वर्धा मेमू ८ ऑगस्ट रद्द करण्यात आली आहे, तर वर्धा ते भुसावळ मेमू ९ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे. याशिवाय बडनेरा ते नाशिक आणि नाशिक ते बडनेरा मेमू गाडी ८ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे.

‘या’ रेल्वे गाड्या होतील लेट

दरम्यान, जळंब ते शेगाव दरम्यानच्या कामांमुळे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे ओखा-पुरी एक्सप्रेस आज बुधवारी (ता.७) भुसावळ विभागात दीड तास थांबवली जाईल. याशिवाय गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस ८ ऑगस्टला १.१० तास थांबवली जाईल. नांदेड-श्रीगंगानगर एक्सप्रेस ८ ऑगस्ट रोजी अर्धा तास थांबवली जाईल. बडनेरा-भुसावळ मेमू ८ ऑगस्ट रोजी ४५ मिनिटे थांबवली जाईल.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button