भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण

Bhusawal News : भुसावळ शहर व तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ठरलेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरवर उभारलेल्या अत्याधुनिक साहित्यांसह शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे आपत्कालीन वेळेत रात्रीही शवविच्छेदन करण्यास कोणताच अडथळा येणार नसून, नागरिकांसह डॉक्टरांची गैरसोय टळणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी विशेष कक्ष उभारण्यात आलेला होता, परंतु शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची कमतरता असल्याने तेथे कार्यरत डॉक्टरांना बऱ्याच वेळेस अडचणीचा सामना करावा लागत असे. मात्र, शासनातर्फे आता नवीन व अत्याधुनिक साहित्य जसे पी.एम.टेबल, बॉडी फ्रिझर, पी.एम ट्रॉली, विविध अवजारे, वजन काटा आदी अत्याधुनिक सामुग्री मिळाल्याने शवविच्छेदनासाठी कमी वेळ लागणार आहे. तसेच मयतांच्या नातेवाईकांना व पोलिसांना मृतदेहाच्या विच्छेदनासाठी तात्काळत उभे राहावे लागणार नाही.

अत्याधुनिक शवविच्छेदन गृहाच्या लोकार्पणावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी (निवासी) डॉ. सुशांत सुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील, डॉ. सनी जैन, डॉ. असिफ पठाण, डॉ. कोटेचा, डॉ. रामवंशी तसेच भारतीय जनता पार्टीचे भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, मुकेश पाटील, सतीश सपकाळे, पवन बुंदेले, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, धनराज बाविस्कर ,विशाल जंगले, रेहमान शेख, कैलास पाटील, सागर जाधव आणि सर्व कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती होती.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button