भुसावळ शहरावर नजर ठेवण्याकरीता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी चार कोटींचा निधी मंजूर

Bhusawal News : भुसावळ शहरावर नजर ठेवण्यासाठी लवकरच तब्बल 442 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याकरीता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 04 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, कॅमेऱ्यांमध्ये वाहनांचे क्रमांकही स्कॅन होणार आहेत.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या 04 कोटी रूपये निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 442 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यापैकी 319 कॅमेरे बाजारपेठ, तर 123 कॅमेरे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसविण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेटचे स्कॅनिंग, 360 अंश व नाईट मोडवर सुस्पष्ट चित्रीकरण, हे नवीन कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य असेल. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांसाठी मोठे सहाय्यक ठरतील, अशी माहिती भुसावळचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. दरम्यान, भुसावळ हे शहर मिश्र लोकवस्तीचे शहर आहे. या शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून व्यक्तिशः पाठपुरावा सुरू होता, अशी प्रतिक्रिया आमदार संजय सावकारे यांनी दिली.

अशी राहील भुसावळ शहरातील कॅमेऱ्यांची जागा
● शहर पोलिस ठाणे हद्द : हंबर्डीकर चौक, ओंकारेश्वर मंदिर, महाराणा प्रताप चौक, न्यायालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, पोलिस वसाहत, सेंट अलॉयसेस हायस्कूल, पंचमुखी हनुमान मंदिर, वाल्मीक नगर, कुंभारवाडा, मरिमाता मंदिर, आराधना कॉलनी, लोणारी हॉल, भोई नगर, स्वामी विहार दत्त नगर, काटेचा कॉलेज, काटेचा स्कूल, पालिका परिसर, सेंट्रल रेल्वे स्कूल, नारखेडे विद्यालय, राहूल नगर, ताप्ती क्लब, रेल्वेन नॉर्थ कॉलनी, महात्मा फुले नगर.
● बाजारपेठ पोलिस ठाणे हद्द : खडका चौफुली, रजा टॉवर, बसस्थानक, नाहाटा चौक, शिवाजीनगर चौक, वांजोळा रोड, मातृभूमी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अमरदीप चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे चौक, स्टेशन चौकी, पांडुरंग टॉकीज, एसबीआय शाखा, वाल्मीक नगर चौक, मोटुमल चौक, दीनदयाल नगर, आनंद नगर (एसबीआय), सिंधी कॉलनी गेट, पुंडलिक बऱ्हाटे शाळा जामनेर रोड, श्रद्धा नगर चौक, डीवायएसपी कार्यालय, पंधरा बंगला बुद्ध विहार इत्यादी महत्वाच्या ठिकाणी बसवले जाणार आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button