BHR case of Jalgaon : जळगावचे बीएचआर प्रकरण; चौकशीसाठी नियुक्त आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके स्वतः कशा अडकल्या ?

BHR case of Jalgaon : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील घोटाळ्याचे प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. या पतसंस्थेतील संचालकांनी केलेल्या १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या तपासासाठी नियुक्त केलेल्या आयपीएस अधिकारी तथा तत्कालीन पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याविरोधातच आता फसवणुकीसह पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे.

BHR case of Jalgaon; How did IPS officer Bhagyashree Navatke himself get trapped?

घोटाळ्याचे तपशील बघता संचालकांनी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असून, सुमारे १६७ कोटींचा गैरव्यवहार अवसायकाच्या काळातील देखील उघडकीस आला आहे. यामुळे एकूण घोटाळ्याची रक्कम १३६७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, तपास चालू असतानाच त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्याने हा तपास आणि त्याचबरोबर संपूर्ण प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

‘एफआयआर’वर तक्रारदाराच्या सह्या कशा आल्या ?

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी समन्वयातून जळगाव येथे एकाच वेळी छापेमारी करून काही गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व गुन्हे एकाच दिवशी दाखल झाले आहेत, ज्यामुळे या प्रकरणात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणातील तीन गुन्ह्यांमध्ये अर्जदाराच्या अर्जावर प्राथमिक चौकशी अहवाल उपलब्ध नाही, ज्यामुळे कारवाईच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच तक्रारदार हजर नसताना दोन गुन्हे घाईगडबडीत दाखल करण्यात आले आहेत. या घाईमुळे तक्रारदाराच्या अनुपस्थितीत एफआयआर दाखल करणे आणि त्यावर तक्रारदाराच्या सह्या आढळणे हे सर्व प्रकरणात एक गंभीर मुद्दा म्हणून पुढे आले आहे. एफआयआरवर तक्रारदाराच्या सह्या कशा आल्या, हे एक मोठे कोडे बनले आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्न उपस्थित होत आहे

या सर्व घडामोडींमुळे जळगावमधील बीएचआर पतसंस्थेच्या एकूण तपासावर आणि गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियावर अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. हा तपास योग्य पद्धतीने झाला का? तक्रारदाराच्या अनुपस्थितीत एफआयआर दाखल करून तपासात काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न तर केला नाही, अशा शंकांचे सावट या प्रकरणावर आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिकाधिक सखोल होण्याची गरज आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button