भडगाव येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी क्रमांक मालिका सुरू

Bhadgaon News : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून, नवीन कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भडगाव, पाचोरा, पारोळा व अमळनेर तालुका राहणार आहे. तसेच आरटीओ कोड MH-54 असा असणार आहे. कार्यालय कार्यान्वीत झाल्यानंतर पहिल्या टप्यात सर्व नवीन वाहनांची नोंदणी भडगाव येथील कार्यालयाव्दारे सुरु झाली आहे.

भडगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील हलके/अवजड मालवाहू वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54.0001 ते 9999, हलक्या मोटार वाहन (परिवहनेतर) खाजगी कार / ट्रॅक्टर-टगेलर/कस्ट्रक्शंन इक्युपमेंट व्हेईकल) वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54B.0001 ते 9999 व तीनचाकी परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी MH54C.0001 ते 9999 पर्यंतची मालिका 22 मार्च, 2024 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी शासकीय शुल्काचा Dy RTO Bhadgaon यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

तसेच नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे गट नं. 84/2/ब/1/ब, मौजे टोणगाव, भडगाव-पाचोरा रोड, आशिर्वाद जिनिंग समोर, भडगाव –424105 ता. भडगाव येथे असून भडगाव, पाचोरा, पारोळा व अमळनेर तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आरटीओ संबधित कामकाज हे भडगाव येथेच करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button