Banana Prices : जाणून घ्या आज बुधवारी (28 ऑगस्ट) कसे आहेत ? बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव !

Banana Prices : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज बुधवार (ता.28 ऑगस्ट) साठी केळीचे संभाव्य बोर्ड भाव जाहीर केले आहेत. त्यानुसार बऱ्हाणपुरात मंगळवारच्या तुलनेत आज कमी दर्जा केळीचे भाव 51 रूपयांनी वाढले आहेत. उच्च दर्जा केळीच्या भावातही 91 रूपयांची वाढ क्विंटल मागे झालेली आहे. रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील नवती व कांदेबाग केळीच्या भावात कोणतीच घट अथवा वाढ झालेली नाही. तिन्ही ठिकाणचे भाव स्थिरच आहेत.

Banana prices of Barhanpur, Raver, Chopda, Jalgaon market

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1501 रू. प्रति क्विंटल
नवती उच्च दर्जा- 2692 रू. प्रति क्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 2025 रू. प्रति क्विंटल
नवती नं. 2- 1925 रू. प्रति क्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1950 रू. प्रति क्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1960 रू. प्रति क्विंटल

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button