Banana Prices : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला कमाल ३००० रूपये क्विंटलचा भाव…!

Banana Prices : राज्यात ठिकठिकाणी कच्च्या केळीच्या बाजारभावात मोठे चढउतार अनुभवण्यास मिळाले आहेत. त्या तुलनेत मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केळीच्या भावात बऱ्यापैकी स्थिरता दिसून आली आहे. बुधवारी (ता.०४) देखील मुंबईत केळीला कमाल ३०००, सरासरी २५०० रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

Banana Prices: Maximum price of banana at Rs 3000 per quintal in Mumbai Agricultural Income Market Committee…!

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.०४) केळीची १२२ क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तत्पूर्वी, मंगळवारी (ता.०३) केळीची १७ क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोमवारी (ता.०२) केळीची ८४ क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. शनिवारी (ता.३१ ऑगस्ट) केळीची ६७ क्विंटल आवक होऊन २००० ते २५०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. शुक्रवारी (ता.३० ऑगस्ट) १८२ क्विंटल आवक होऊन २००० ते २६०० रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button