मंगळवार ( ता. 02 जुलै ) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

जळगाव टुडे । बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज मंगळवार ( ता.02 जुलै ) साठी केळीचे संभाव्य बोर्ड भाव जाहीर केले आहेत. त्यानुसार बऱ्हाणपुरात सोमवारच्या तुलनेत आज कमी दर्जा केळीच्या भावात प्रति क्विंटलमागे 77 रूपयांची वाढ झाली आहे, तर उच्च दर्जा केळीच्या भावात 114 रूपयांची वाढ झाली आहे.
रावेर तसेच चोपडा आणि जळगावमधील केळीच्या भावात कोणतीच वाढ अथवा घट झालेली नाही. तिन्ही ठिकाणच्या बाजार समित्यांचे भाव स्थिरच आहेत. ( Banana Market Rate )

बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1052 रू. प्रति क्विंटल
नवती उच्च दर्जा- 1440 रू. प्रति क्विंटल
रावेर :
नवती नं. 1- 1670 रू. प्रति क्विंटल
नवती नं. 2- 1520 रू. प्रति क्विंटल
चोपडा :
कांदेबाग- 1595 रू. प्रति क्विंटल
जळगाव :
कांदेबाग- 1605 रू. प्रति क्विंटल

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button