Banana Crop Insurance : केळी पिकविमा भरपाई; बैठकीच्या आयोजनासाठी जळगावच्या कृषी विभागाची टोलवाटोलवी !

Banana Crop Insurance : जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६८८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना अजुनही हवामानावर आधारीत पिकविमा योजनेची भरपाई मिळालेली नाही. सदरची रक्कम तातडीने मिळण्याच्या मागणीसाठी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीने नुकतेच धरणे आंदोलन देखील केले. दरम्यान, पिकविम्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कृषी सचिव तसेच कृषी आयुक्तांसोबत घेण्यात येणाऱ्या बैठकीची तारीख १८ जुलैला कळविण्यात येईल, असे आश्वासन कृषी विभागाकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यासंदर्भात कोणतीच हालचाल झालेली नाही.

Banana Crop Insurance; Jalgaon’s agriculture department tolls for organizing the meeting!
केळी पिकविमा योजनेतील प्रलंबित भरपाई संदर्भात बैठकीची तारीख कळविण्याच्या बाबतीत जळगावच्या कृषी विभागाकडून आता टोलवाटोलवी केली जात आहे, हे लक्षात घेऊन माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगावच्या कृषी अधीक्षकांना खरमरीत पत्र दिले आहे. केळी पिकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीची तारीख वेळेवर न कळविल्यास महाविकास आघाडी पुन्हा आंदोलन छेडेल, असा इशारा त्यामुळे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी पुन्हा दिला आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.१८) दिवसभर कृषी विभागाने पुणे येथील आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु, काहीच उपयोग झाला नाही.

गायीच्या दुधाला ३० रूपये लिटरचा खरेदी दर तसेच पाच रूपये अनुदान देण्यात यावे, कापूस उत्पादकांना सरसकट अनुदान द्यावे, ज्वारी खरेदीला सुरूवात करावी, केळी उत्पादकांना पिकविमा भरपाई द्यावी, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीने जळगावमध्ये गेल्या आठवड्यात धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने आंदोलकांशी केलेल्या चर्चेतून तीन मागण्या मान्य सुद्धा केल्या होत्या. मात्र, केळी पिकविम्याचा प्रश्न आयुक्तांच्या स्तरावरचा असल्याने त्यांच्यासह कृषी सचिवांच्या बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही कृषी विभागाने दिली होती. याशिवाय बैठकीची तारीख १८ जुलैपर्यंत कळविण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्यासंदर्भात काहीच कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेले माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगावच्या कृषी विभागाला पत्र देऊन त्याविषयीचा जाब विचारला आहे. बैठकीची तारीख न कळविण्यास पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा देखील दिला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button