Badalapur Case : बदलापूर प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेच्या मोबाईलमध्ये आढळले अश्लील व्हिडीओ…!

Badalapur Case : बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतरही शाळा व्यवस्थापन तसेच पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते. नागरिकांचा उद्रेक झाल्यावर पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली असून, तपासात त्याच्या मोबाईलमध्ये बरेच अश्लील व्हिडीओ आढळून आले आहेत.

Badalapur Case : Obscene video found in accused Akshay Shinde’s mobile…!

दरम्यान, बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी एक गंभीर आरोप केला आहे की, या प्रकरणातील तथ्य बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिस अधिकाऱ्याने शाळा व्यवस्थापनासोबत गुप्त बैठक घेतली होती. पीडित मुलीच्या पालकांनी याला बदलापूर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. या आरोपामुळे या प्रकरणातील साशंकता आणखी वाढली आहे. पीडित कुटुंबीयांच्या मते सदर महिला अधिकारी कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आरोपांनंतर बदलापूर प्रकरणाची सत्यता शोधण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशीही मागणी होत आहे.

२४ वर्षांच्या आरोपी अक्षय शिंदेने केली होती तीन लग्ने

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अक्षय शिंदेच्या गावी दिव्य मराठीचे प्रतिनिधी पोहोचले आहेत. अक्षयच्या शेजाऱ्यांनी आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी दिव्य मराठीशी संवाद साधला. या संवादातून अक्षयच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. अक्षयच्या काही शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ 24 वर्षाच्या वयात अक्षयने तीन लग्न केली होती. मात्र, दुर्दैवाने, तिन्ही बायकांनी त्याला सोडून दिले. यातील दोन लग्न तर अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत झाली होती. त्याचे तिसरे लग्नही महिनाभरच टिकले होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button